गझनी चित्रपटात दिव्यांगाची भूमिका वठवलेल्या वसंत पाटील यांचे निधन
यावल : गझनी चित्रपटात दिव्यांगाची भूमिका वठवलेल्या यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील रहिवासी व हल्ली मुंबईस्थित दिव्यांग बुद्धिबळ संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू वसंत दीपचंद पाटील (75) यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. गुरुवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे. ते किनगाव येथील गोपाळ पाटील यांचे बंधू तर शिरीष पाटील यांचे वडील होत.
गजनी चित्रपटातही साकारली भूमिका
वसंत पाटील हे जन्मत अंध (दिव्यांग) होते तर मुंबई येथे संगीत विषारदची पदविका मिळवत अंधत्वावर मात करीत त्यांनी महानगरपालिकेच्या शाळेत संगीत शिक्षक म्हणून नोकरी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांगांच्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्वदेखील त्यांनी केले होते तर डिसेंबर 2008 मध्ये दाक्षिणात्य चित्रपट निर्माता ए.आर. मृर्दुगोज यांच्या आमीर खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी दिव्यांगाची भूमिका साकारली होती व ते प्रकाशझोतात आले होते. अनेक तरुणांसाठी ते प्रेरणादायी होते.


