राजधानी एक्स्प्रेसला ग्वाल्हेरला थांबा : वेगही वाढणार


भुसावळ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट विशेष गाडीचा वेग वाढवण्यासह ग्वाल्हेर येथे या गाडीला थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 01221/01222 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हजरत निजामुद्दीन (आठवड्यातून 4 दिवस) राजधानी सुपरफास्ट विशेष गाडीचा वेग वाढवण्यात आला असून ग्वाल्हेर येथे या गाडीला थांबा देण्यात आला आहे.
9 जानेवारीपासून गाडी क्रमांक 01221 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी दुपारी चार वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी 9.55 वाजता हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 01222 ही राजधानी सुपरफास्ट विशेष गाडी 10 जानेवारीपासून हजरत निजामुद्दीन येथून दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी दुपारी 4.55 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी 11.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई स्थानकावर पोहोचेल.

या स्थानकावर राजधानीला थांबा
राजधानी एक्स्प्रेसला कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भोपाळ, झांसी, ग्वालियर आणि आग्रा कॅन्ट स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येणार असून प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !