रेल्वे दरोड्यातील आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी


भुसावळ : एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी प्रवाशांना लुटल्याची घटना घडल्यानंतर सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना लोहमार्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहाही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ल2ोहमार्ग पोलिसांनी जावेद्दीन शेख समशोद्दीन शेख (23, रा.गौसिया नगर, भुसावळ), अबरार शेख रज्जाक शेख वयत (28, रा. ग्रीन पार्क, डायमंड कॉलनी, खडका रोड, भुसावळ), मोहंमद सलीम लल्लू कुरेशी,
(गौसिया नगर, भुसावळ), अजीम शेख सलीम शेख (26, रा.गौसिया नगर, भुसावळ), शेख शाहरूख उर्फ साहू शेख अजगर (24, रा.गौसिया नगर, भुसावळ) व मोहंमद इस्त्राईल निहाल अहमद (रा.गौसिया नगर, भुसावळ) अशी अटकेतील संशयीतांची नावे असून त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक सुरेश सरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक पौर्णिमा राखुंडे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !