ग्रामपंचायत निवडणूक : 840 कर्मचार्यांना निवडणूक प्रशिक्षण
रावेर : रावेर तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शनिवारी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी 840 कर्मचार्यांना निवडणूक प्रशिक्षण दिले. रावेर तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारीला निवडणूक होत आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी निवडणुकीसंदर्भात सविस्तर माहिती दिली तसेच निवडणुकीचे प्रात्यक्षिक दाखविले. 840 कर्मचार्यांना दोन शिप्टमध्ये निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक विक्रम बांदलदेखील उपस्थित होते. प्रशिक्षणाला सहकार्य म्हणून अव्वल कारकून विठोबा पाटील यांनीदेखील सहकार्य केले.
उपशिक्षकांची तहसीलदारांकडून झपाई
48 ग्रामपंचायत निवडणुकीची माहिती उपस्थित कर्मचार्यांना तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समजवून सांगत असतांना निंबोल येथील उपशिक्षक विजय चौधरी हे प्रशिक्षणाला गांभीर्याने न घेता बाहेर फिरत असल्याने तहसीलदारांनी त्यांना प्रशिक्षणस्थळी बोलावून निवडणूक संदर्भात माहिती विचारली असता त्यांना ती देता न आल्याने तहसीलदार त्यांच्यावर चांगल्या संतापल्या.


