भुसावळ उपनगराध्यक्षा शे.सईदा शफींनी अखेर दिला राजीनामा


भुसावळ : पालिकेच्या उपनगराध्यक्षा शे.सईदा शफी यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याकडे सुपूर्द केला. या बाबतचा अहवाल मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवला असून आता उपनगराध्यक्ष पदावर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. पालिकेतील सत्ताधारी भाजप गटाने पाच वर्षांत पाच नगरसेवकांना उपनगराध्यक्षपदाची संधी देण्याचे नियोजन केले मात्र आतापर्यंत केवळ युवराज लोणारी, लक्ष्मी मकासरे व शे.सईदा शफी या तीनच नगरसेवकांना संधी मिळाली. ठरल्याप्रमाणे एक वर्षाचा कार्यकाळ झाल्यानंतरही शे. सईदा शफी यांनी राजीनामा दिला नव्हता. अखेर बुधवारी त्यांनी राजीनामा दिला असून आता 15 दिवसांनी विशेष सभेत उपनगराध्यक्ष निवड होईल.

यांना संधी मिळण्याची शक्यता
उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक प्रमोद नेमाडे, रमेश नागराणी, राजेंद्र नाटकर, निर्मल कोठारी, सोनी बारसे आदी नावे चर्चेत असून प्रत्येक नगरसेवकास दोन महिन्यांसाठी ही संधी दिली जाईल मात्र यातील काहींनी अल्प काळासाठी पद स्वीकारण्यास संधी नाकारली आहे तर आता प्रथम कुणाची वर्णी लागते? याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !