11 लाख 50 हजारांची वाळू लांबवली : अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा


रावेर : तालुक्यातील निंभोरासीम येथे तीन ठिकाणी 504 ब्रास वाळूचा अवैध साठा गतवर्षी 10 नोव्हेंबरला महसूल विभागाने जप्त केला होता मात्र त्याची लिलाव प्रक्रिया तातडीने न राबवल्याने अज्ञातांनी 11 लाख 56 हजार 300 रुपयांची 413 ब्रास वाळूची चोरी गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी निंभोरासीमचे पोलिस पाटील मगन सवर्णे यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बापू पाटील करत आहेत. दरम्यान, जप्त वाळू साठ्याचा तत्काळ लिलाव झाला असता तर महसूल रकमेत वाढ झाली असती मात्र हा महसूल आता बुडाला आहे. या प्रकरणी नेमके कोण दोषी व कोणावर कारवाई होणार? याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !