यावल तालुक्यात 46 ग्रा.पं.निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज


यावल : तालुक्यातील 46 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत असून निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. गुरुवारी निवडणूक साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले. तालुक्यात 179 मतदान केंद्र असून 359 ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीकरीता 179 ईव्हीएम यंत्रणेवर सुमारे 95 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण 895 उमेदवार निवडणूक रींगणात आहेत.

यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया
संपूर्ण ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक निरीक्षक व्ही.व्ही.बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, नायब तहसीलदार आर.डी.पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.निलेश एस.पाटील व 27 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह सुमारे 900 कर्मचारी पार पाडत आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी कायदा सुव्यवस्थेसाठी विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक नारखेडे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलिस उपनिरीक्षक विनोद रवांडबहाले यांच्यासह 100 पोलिस कर्मचारी, 125 गृहरक्षक दलाचे कर्मचारी, आठ स्कुल बस, 26 क्रुझर, 2 इको, 1 टाटा सुमो, 2 टवेरा, 3 बोलेरो, तीन एस.टी.बस मिळुन 51 वाहने अधिग्रहीत करण्यात आली आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !