मी राष्ट्रवादीचा निष्ठावान पदाधिकारी : संतोष माळी


वरणगाव : पालिका निवडणूक तोंडावर आली असताना काही लोकांकउून आपण राष्ट्रवादी पक्ष सोडणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात असून असून आपण पक्षाशी प्रामाणिक असून पक्षातच राहणार असल्याचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष माळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

माजी नगराध्यक्षांवर केला आरोप
माळी यांच्या पत्रानुसार गुरुवारी महात्मा फुले सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमजिल्हाधिकारी यांच्या आदेशाने रद्द झाला असतांनाही माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नागरी सत्कार घडवून आणत व्यासपीठावरून माळी समाज व मी त्यांच्या सोबत असल्याचे सांगून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक भावनेतून लावलेल्या स्वागत फलकांच्या माध्यमातून कार्यक्रम व समाज बांधवांचे भाजपेयीकरण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला असून या सर्व प्रकारांमुळे मी अत्यंत व्यथित असून माझा कोणत्याही भाजप पदाधिकारी व कार्यक्रमाशी दुरान्वये संबंध नसल्याचे माळी कळवतात. राष्ट्रवादी शहराध्यक्ष म्हणून अतिशय प्रतिकूल परीस्थितीतून आजतागायत निष्ठेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम मी करत आहे व भविष्यात ही करत राहणार असून आपल्यावर प्रेम करणार्‍या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असेही संतोष बळीराम माळी यांनी कळवले आहे.


आरोप निराधार : सुनील काळे
संतोष माळी हे माझे परममित्र असून त्यांनी केलेल्या आरोपामागे त्यांचा बोलवता धनी वेगळा असल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले. त्यांनी केलेले आरोप निराधार असल्याचेही ते म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !