कर्तव्यात कसुर : रावेर पंचायत समितीचे वरीष्ठ लिपिक निलंबित
रावेर : पंचायत समितीतील समाजकल्याण विभागाचे वरीष्ठ लिपिक सलीम तडवी यांना जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी निलंबित करण्याबाबत आदेश काढल्यानंतर रावेर पंचायत समितीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रावेर पंचायत समिती कार्यालयात समाजकल्याण विभागाचे वरीष्ठ लिपिक म्हणून सेवारत असलेले सलीम तडवी हे सेवेत नेहमी विनापरवानगीने सतत गैरहजर राहणे, समाजकल्याण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देतांना कर्तव्यात नेहमी कसूर करीत असल्याच्या तक्रारी आल्याने त्याची दखल घेत जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी निलंबनाचे आदेश काढल्याने पंचायत समितीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.


