महिलेवर चाकू हल्ला केलेल्या संशयीताची आत्महत्या
यावल : तालुक्यातील किनगाव येथे एका व्यक्तिने शेतात काम करणार्या महिलेवर चाकू हल्ला केल्यानंतर स्वतःदेखील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सोमवार, 25 जानेवारी रोजी सायंकाळी आडगाव शिवारातील विनय पाटील यांच्या शेतात काम करणार्या एका 28 वर्षीय महिलेवर चंद्रकांत वसंत खलसे (45) या संशयीताने चाकूने हल्ला केला होता व त्यानंतर आडगाव शिवारातील विनय पाटील यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली. मंगळवार, 26 जानेवारी रोजी मजुर शेतात कामास गेले असता चाकू हल्यातील संशयीत चंद्रकांत खलसे यांचा मृतदेह हे विहिरीत आढळल्यानंतर पोलिसांना माहिती कळवण्यात आली.


