भुसावळात सेलिब्रेशन कापड दुकानाला आग : आठ लाखांचे नुकसान


भुसावळ : शहरातील मॉर्डन रोड वरील पोस्ट ऑफिससमोरील सेलिब्रेशन या कापड दुकानात शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री वाजता उघडकीस आल्यानंतर व्यावसायीकांची मोठी धावपळ उडाली. या आगीत दुकानातील महागडे कपडे जळाल्याने सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांचे लहान बंधू सईद पिंजारी यांच्या मालकिचे हे दुकान आहे. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.


शॉर्ट सर्किटने आगीचा संशय
मंगळवारी साप्ताहिक बंद असल्याने सेलिब्रेशन दुकानही बंद होते मात्र रात्री आठ वाजेच्या सुमारास दुकानातून धूर निघत असल्याची माहिती नागरीकांना कळताच दुकान मालकाला माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेत अग्निशमन दलालाही माहिती कळवली. आगीमुळे दुकानातील महागडे कपडे जळाल्याने सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले. आगीची माहिती कळताच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अर्चित चांडक, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला तसेच कर्मचार्‍यांनी धाव घेतली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !