सावद्यात चार कोंबड्यांचा मृत्यू
बर्ड फ्लूची भीती : पशूसंवर्धन विभागाने दखल घेण्याची अपेक्षा
सावदा : शहरताल खाजानगर भागातील गौसियानगर भागात रहिवासी असलेले शेख निसार शेख नबी यांच्याकडील चार कोंबड्यांचा दोन मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. या कोंबड्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे तर झाला नाही ना? असा प्रश्नदेखील या निमित्ताने उपस्थित होत असून पशु संवर्धन विभागाने याबाबत स्पष्टीकरण करावे, अशी अपेक्षा आहे.
माना टाकत कोंबड्यांचा मृत्यू
गौसियानगर भागातील शेख निसार शेख नबी यांच्याकडील दोन कडकनाथ जातीच्या कोंबड्यांचा मृत्यू झाला. सुरवातीला येथील कोंबड्या सुस्तावलेल्या अवस्थेत येऊन काही वेळातच माना टाकून मृत पावत आहे. मंगळवारीदेखील अशाच प्रकारे दोन देशी कोंबड्यांचा मृत्यू झाला असल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. मृत कोंबड्यांची खबरदारी म्हणून त्या दफन करण्यात आल्या. पशू वैद्यकीय अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी यांनी याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

2006 च्या आठवणीत अद्यापही कायम
यापूर्वी मार्च 2006 मध्ये सावद्यात बर्ड फ्लूमुळे मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा मृत्यू ओढवला होता व येथून साथ पसरत गेल्यानंतर परीरसरातील मस्कावद, चिनावल आदी गावात मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू ओढवला होता. त्यावेळी या भागातील हजारो कोंबडया मारण्यात आल्या होत्या आता पुन्हा एकदा सावदा परीसरात कोंबड्या मरण पावल्याने पोल्ट्री फार्म चालकांच्या गोटात भीती पसरली आहे.


