विकासकामांमध्ये खोळंबा आणणार्‍या शुक्राचार्याला उघडे पाडणार


पालकमंत्री गुलाबराव पाटील : भुसावळात शिवसेनेच्या विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान

गुलाबराव उवाच : 90 कोटींची योजना 214 कोटींवर नेणार्‍यांना पाप भरावेच लागेल ः सत्ताधार्‍यांना माल मिळणार्‍या कामांमध्ये रस

भुसावळ : भुसावळात कोट्यावधींचा निधी दिल्यावर सुद्धा विकासकामे होत नाहीत, जनतेने धुळ खण्याकरता सत्ता दिली नाही, 90 कोटींची अमृत योजना 214 कोटींची झाली हे पाप सत्ताधार्‍यांना फेडावेच लागणार असून माल मिळणार्‍या कामांमध्ये फक्त यांना रस उरला असून शहर विकासकांमात खोळंबा आणणार्‍या शुक्राचार्याला उघडे पाडणार असल्याचा सणसणीत इशारा शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिला. मंगळवारी सायंकाळी जुना सातारा विभागात माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्या शिवसेना विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भुसावळ तालुक्यातील जेष्ठ शिवसैनिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

सत्तेचा उपयोग केवळ अर्थ कारणासाठी
भुसावळात शिवसेनेचे गत वैभव मिळवून देण्यास वचनबद्ध आहे, शिवसैनिकांनी कणखरपणे सत्ताधार्‍यांच्या चुकीच्या कामांना विरोध करा, काम न करणार्‍या अधिकार्‍यांना वठणीवर आणू, असा इशारा देताना गुलाबराव म्हणाले की, नागरीकांनी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत यांना सत्ता दिली पण सत्तेचा उपयोग यांनी फक्त अर्थ कारणासाठी केला. 10 दिवसात पालिका अधिकार्‍यांची बैठक लावणार असून कामे न करणार्‍या झोपाळू अधिकार्‍यांना वठणीवर आणू, असा इशाराही त्यांनी दिला.



यांची होती उपस्थिती
याप्रसंगी आमदार लता चंद्रकांत सोनवणे, माजी जिल्हाप्रमुख अ‍ॅड.जगदीश कापडे, माजी नगराध्यक्ष नीळकंठ फालक, उपजिल्हा संघटक विलासजी मुळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, उपजिल्हा प्रमुख अ‍ॅड.श्याम गोंदेकर, कार्यालयीन उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे, निलेश महाजन, शारदा दीपक धांडे, महिला आघाडी जिल्हा संघटक  पूनम बर्‍हाटे, तालुका संघटक भुरा चव्हाण, जि.प.सदस्य सरला कोळी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, रेल कामगार सेना मंडल अध्यक्ष ललित मुथा, शिक्षकसेना जिल्हा प्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, उपतालुका प्रमुख समाधान पाटील, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, युवासेना जिल्हा युवाअधिकारी अ‍ॅड.चंद्रकांत शर्मा, तालुका युवा अधिकारी हेमंत बर्‍हाटे, शहर युवा अधिकारी सुरज पाटील, शहर संघटक योगेश बागुल, ग्राहक संरक्षण कक्ष शहर प्रमुख मनोज पवार, उपशहर प्रमुख स्वप्नील सावळे, उपशहर प्रमुख राकेश खरारे, माजी नगरसेवक अ‍ॅड. नरेंद्र लोखंडे, विभाग प्रमुख अमोल पाटील, अ‍ॅड.निर्मल दायमा, शाखा प्रमुख पिंटू भोई, माजी शहर युवा अधिकारी सागर वाघोदे, प्रसिध्दी प्रमुख गोकुळ बाविस्कर, अल्प संख्यांक आघाडी तालुका संघटक अबरार खान, शहर संघटक शेख मेहमुद, माजी नगरसेवक अनिल भोळे, कैलास लोखंडे, सदाशिव पाटील, शांताराम इंगळे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, नगरसेवक संजीव कोलते, वरणगाव शहर प्रमुख रवी सुतार, हेमंत खंबायत, नमा शर्मा व शिवसेना अंगीकृत संघटना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

भुसावळ पालिकेवर सेनेचा भगवा फडकणार : अ‍ॅड.कापडे
खान्देशातून शिवसेनेचा पहिला आमदार भुसावळाचाच  होता. संघटना म्हणूनच शिवसेनेच कामं जोमाने करा, शिवसेनेचा भगवा भुसावळ नगरपालिकेवर फडकण्याच्या दृष्टीने आतापासूनच जोरदार तयारीला लागा,’ कोरोनाच्या संकटाच्या काळातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने आपले काम चोख पार पाडले. अशावेळी तुम्ही सर्व जण सरकारने केलेली कामे घेऊन पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, पुढचा नगराध्यक्ष शिवसेनेचाच असेल, असा विश्‍वास माजी जिल्हा प्रमुख जगदीश कापडे यांनी मार्गदशनात केले. माजी नगरसेवक दीपक धांनी यांनी भुसावळातील हद्दवाढ, गुन्हेगारीचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न सोडवावे तसेच ज्येष्ठ नागरीक नागरीकांना लाभार्थीं म्हणून असलेली वयोमर्यादा कमी करावी, अशी मागणी प्रास्ताविकातून केली. जळगावूुन येणार्‍या भुसावळातील वाय पॉईंटला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी आयोजकांनी केली.

यांनी घेतले परीश्रम
माजी नगरसेवक दीपक धांडे, शारदा धांडे, अ‍ॅड.नरेंद्र लोखंडे, हेमंत चौधरी, राकेश खरारे, सागर वाघोदे, अमोल पाटील, स्वप्नील सावळे, गोकूळ बाविस्कर, पिंटू भोई, चेतन भोई, किरण बढे व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.
शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !