भादली-जळगाव दरम्यानचे समपार फाटक बंद
भुसावळ : रेल्वे प्रशासनाद्वारा भादली-जळगाव दरम्यान अभियांत्रिकी विभागाद्वारे रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे कार्य सुरू असल्याने 29 व 30 जानेवारी रोजी किलोमीटर क्रमांक 429/5-7 मध्ये कार्य केले जार असून समपार फाटक (लेव्हल क्रॉसिंग गेट) क्रमांक 152 हे पहाटे सहा ते सायंकाळी सहा दरम्यान बंद राहणार आहे. वाहनधारकांसह पादचार्यांनी या संदर्भात दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


