चोरीच्या वाळूसह ट्रक बाजारपेठ पोलिसांनी केला जप्त


भुसावळ : चोरीच्या वाळूसह ट्रक बाजारपेठ पोलिसांनी जप्त करीत चालकासह क्लीनरला अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी चालक पवन देविदास नन्नावरे (बांभोरी, धरणगाव) व क्लिनर श्रीराम गणपत साळुंखे (बांभोरी, धरणगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. बुधवारी पहाटे बाजारपेठ पोलिसांचे पथक गस्तीवर असताना पहाटे अडीच वाजेच्या सुमारास जामनेर रस्त्यावर ट्रक (एम.एच.04 सी.पी.3312) आल्यानंतर पोलिसांना त्यात सुमारे दिड ब्रास वाळू आढळल्याने संबंधिताना परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिल्यानंतर दोघा आरोपींविरुद्ध 17 हजार 500 रुपयांची वाळू चोरी केल्याप्रकरणी ईश्‍वर संजय भालेराव यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दोन लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक मंगेश गोटला, कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव, होमगार्ड अकबर गवळी, प्रीतम किर्तीकर आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !