खासदार रक्षा खडसे यांच्याबद्दलचा आक्षेपार्ह उल्लेख हटविला
मुंबई : रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नावासमोर भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्यानंतर टिकेची झोड उठली होती शिवाय राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर संताप व्यक्त करत कारवाईचा इशारा दिला होता. दरम्यान, भाजपने चुक सुधारली असून नावासमोरील आक्षेपार्ह उल्लेख हटविला आहे. आता त्यांच्या नावासमोर रावेर (महाराष्ट्र) असा उल्लेख करण्यात आला आहे.


