दिल्लीतील आंदोलनात अंबाबारीच्या महिला कार्यकर्त्याचा मृत्यू


नंदुरबार : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथील लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्या सीताबाई रामदास दळवी (56) यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेसहा वाजता घडली. त्याचे शव अंबाबारी येथे आणण्यात येत असून त्यांच्या मृतदेहावर शुक्रवारी दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

झोपेतच झाला मृत्यू
लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रत्येक आंदोलनात हिरारीने सहभाग घेणार्‍या सीताबाई दळवी या दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांची रेल्वे हुकल्याने सर्वच आंदोलकांनी जयपूर येथे मुक्काम ठोकला. गुरुवारी सीताबाई तडवी यांची तब्बेत खराब झाली. सकाळी उठून त्यांनी दात घासले व त्या पुन्हा झोपून गेल्या व या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आंदोलकांकडून देण्यात आली. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाले आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !