नांदेड ते जम्मूतवी दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस धावणार
भुसावळ : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड ते जम्मू तावी दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नांदेड ते जम्मू तावी सुपरफास्ट एक्स्प्रेस
डाऊन 02751 नांदेड ते जम्मू तावी सुपरफास्ट विशेष गाडी 29 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी नांदेड येथून 11.05 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी जम्मू तावी येथे रात्री 11.5 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला अकोला, मलकापूर येथे थांबा देण्यात आला आहे. अप 02752 जम्मू तवी ते नांदेड सुपरफास्ट विशेष गाडी 31 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर रविवारी जम्मूतवी येथून 5.45 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी नांदेड येथे 3.50 वाजता पोहोचेल. या गाडीला मलकापूर, अकोला स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 16 वातानुकुलीत तृतीय श्रेणी बोगी जोडण्यात येतील. पूर्णपणे आरक्षीत गाडीत केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवेश दिला जाणार असून प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.



