वरणगावात थकीत पगारासाठी नगरपालिका कर्मचार्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
सामोपचाराने वादावर पडदा : दहा दिवसात कर्मचार्यांना पगाराचे आश्वासन
वरणगाव : पालिकेतील कर्मचार्यांचे सात महिन्यांपासून पगार रखडल्याने पालिका कर्मचार्यांनी कुटुंबातील सदस्यांना घेत शुक्रवारी सकाळी पालिका आवार गाठत रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र वेळीच हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या प्रकारामुळे काही वेळ वातावरण तणावाचे निर्माण झाले मात्र सामोपचारानंतर वादावर पडदा पडला व 10 दिवसात पगार करण्यात येतील या आश्वासना नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मुख्याधिकारी शाम गोसावी यांची बदली
वरणगाव पालिकेचे मुख्याधिकारी श्याम गोसावी यांची मुख्याधिकारी ब संवर्गातून अ संवर्गात पदोन्नती झाल्याने जळगाव पालिकेत आयुक्त पदी पदोन्नती झाल्याने वरणगाव पालिकेचा पदभार सावदा येथील मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजीत राऊत यांनी काढले. यामुळे पुढील काळात सौरभ जोशी यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

किमान वेतन कायद्यानुसार पगार पाहिजे
पालिकेने प्रत्येक कर्मचार्याला किमान वेतन कायद्यानुसार पगार दिला पाहिजे. यासाठी वसुली मोहिम सुरू केली पाहिजे. कर्मचार्याची घरची परीस्थिती बिकट झाली असून यासाठी पालिकेच्या अधिकार्यांनी स्वत: वसुलीसाठी प्रयत्न गरजेचे असल्याचे भारतीय मजदुर संघाचे अध्यक्ष अनंत गडे म्हणाले.


