रोटरीच्या विविध पदांवर नियुक्तीनंतर ताप्ती व्हॅलीतर्फे सत्कार
भुसावळ : आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबच्या असीस्टंट रीजनल रोटरी फाऊंडेशनच्या कोर्डीनेटरपदी राजीव शर्मा, डीस्ट्रीक्ट जॉईन्ट सेक्रेटरी 3030 पदी धमेंद्र मेंडकी यांची तर डीस्ट्रीक्ट रोटरॅक्ट रीप्रेझेन्टेटीव्हपदी लोकेश कंसल यांची निवड झाल्याने रोटरी क्लब ऑफ भुसावल ताप्ती व्हॅलीच्या वतीने गौरव करण्यात आला. रोटरी इन्टरनॅशनल ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहे. या माध्यमातून समाजातील वंचित घटकांपर्यंत विविध योजना पोहचविल्या जात असतात. यासाठी गेल्या अनेक वर्षापासून रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहे. या कामाची दखल घेवून त्यांना रोटरी च्या वतीने भारताच्या पूर्व भागातील झोन क्रमांक सहाच्या असि. रीजनल रोटरी फाऊंडेशनच्या कोर्डीनेटरपदी पुन्हा नियुक्ती करणयात आली. तसेच रोटरी क्लब 3030 चे माजी असि.गव्हर्नर धमेंद्र मेंडकी यांची डीस्ट्रीक्ट जॉईन्ट सेक्रेटरी 3030 पदी नियुक्ती झाली आहे. तरुण मुलांची रोटरॅक्ट च्या डीस्ट्रीक्ट रोटरॅक्ट रीप्रेझेन्टेटीव्ह 21-22 साठी लोकेश कान्सल यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे प्रोजेक्ट सेक्रेटरी संजू भटकर, योगेश इंगळे, जीवन महाजन, प्रदीप सोनवणे, समाधान जाधव, किशोर पाचपांडे, सुनील वानखेडे आदी उपस्थित होते.



