सावदा नगरपालिका व ओरीजनल पत्रकार संघातर्फे 1 रोजी वृक्षारोपण
सावदा : सावदा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन ‘माझी वसुंधरा’ अभियान अंतर्गत सावदा नगरपालिका व ओरीजनल पत्रकार संघ, सावदा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 1 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी 100 झाडे लावण्यात येतील. कोचूर रोड तसेच जुना सावदा रोड आदी ठिकाणी हे वृक्षारोपण होईल. याच दिवशी दुपारी तीन वाजता पालिकेने माझी वसुंधरा या अभियाना अंतर्गत विविध पेट्रोल व डीझेल पासून होणारे प्रदूषण टाळता यावे यासाठी इलेक्ट्रॉनिक गाड्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून नगरपालिकेचे जवळ पालिकेचे वतीने या इलेक्ट्रॉनिक गाड्या चार्जिंग साठी मोफत चार्जिंग पॉइंट उभारण्यात आला असून याचा शुभारंभ देखील याच दिवशी होणार आहे. या कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी सौरभ जोशी व ओरीजनल पत्रकार संघ, सावद्याच्या सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.


