सावद्यातील खंडेराव देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा


आमदार चंद्रकांत पाटील व माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्या प्रयत्नांना आले यश

सावदा : सावदा शहरातील असलेले खंडेराव वाडीमधील खंडेराव देवस्थानाला तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाला आहे. याकामी आमदार चंद्रकांत पाटील यांचा पाठपुरावा मोलाचा ठरला आहे. सावद्याचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे मुक्ताईनगर, मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथे जिल्हा नियोजन भवनात झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत हा मुद्दा लावून धरत निधी खेचून आणल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाविकांची अनेक वर्षांची मागणी मार्गी लागली आहे.

जीन्सी महादेव मंदीर येथे विद्युत पुरवठा
शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये जीन्सी, ता.रावेर येथील महादेव मंदिर येथील मंदिरात विद्युत पुरवठा नसल्याने त्या ठिकाणी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक यांनी हा मुद्दा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कानावर टाकल्यानंतर त्यांनी पालकमंत्री यांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकार्‍यांना जीन्सीच्या महादेव मंदीरात विद्युत पुरवठा करण्याचे आदेश दिल्यानेही समाधान व्यक्त होत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !