भुसावळ तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीवर ‘महिलाराज’


भुसावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी पंचायत समिती सभागृहात आरक्षण सोडत

भुसावळ : तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गुरुवारी एस.सी., एस.टी., ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणानंतर शुक्रवारी पुन्हा महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. भुसावळ तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींवर महिलांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. ग्रामीण भागात आता सत्तेस्थापनेसाठी जोरदार फिल्डींग लावली जात आहे. पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. तहसीलदार दीपक धीवरे, गटविकास अधिकारी विलास भटकर, भगवान शिरसाठ आदी उपस्थित होते.

या गावांमध्ये एस.सी.उमेदवाराला संधी
तालुक्यातील तळवेल, मोंढाळा, मन्यार खेडा आणि जाडगाव येथे एस.सी.प्रवर्गातील महिला सरपंच होणार आहे.



गावांमध्ये एस.टी.पदाच्या उमेदवाराची होणार निवडणूक
तालुक्यातील कंडारी, साकेगाव, मांडवादिगर येथे एस.टी.प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवाराला सरपंच पदाची संधी मिळणार आहे. मांडवा दिगर येथे चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आले.

या गावांमध्ये ओबीसी महिला सरपंच
तालुक्यातील काहुरखेडा, पिंप्रीसेकम, सुसरी, वांजोळे, कन्हाळे बुद्रूक आणि जोगलखेडा येथे ओबीसी सदस्य सपंच होणार आहे.

सात जागांवर जनरल महिला सदस्याला संधी
तालुक्यात सात जागांवर जनरल प्रवर्गातून महिला सरपंच होतील, यात हतनूर, गोजोरा, सुनसगाव, टहाकळी, दर्यापूर, आचेगाव आणि किन्ही ग्रामपंचायतीचा समावेश आहे. दरम्यान, तालुक्यातील किन्ही येथे महिला सरपंच होते, तेथे पुन्हा महिला सरपंचांचीच जागा निघाली आहे. त्यामुळे किन्ही येथे पुन्हा महिला सरपंचाच्यात हातीच पुन्हा सत्ता येणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !