महाराष्ट्रात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करण्याचा प्रयत्न


पत्रकार कमलाकर माळी यांचा प्रजासत्ताक दिनी अनोखा उपक्रम

रावेर : तालुक्यातील मोठे वाघोदा येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कमलाकर माळी यांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी एक अनोखा उपक्रम राबवला. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई यांच्या 101 डिजिटल प्रतिमा मोफत भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबवला. त्या प्रतिमा पोस्ट ऑफीस भारतीय डाक घरतर्फे घरपोच त्यांच्या पत्त्यावर पोहोचविण्यात आल्या. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर व्हावा यांचे विचार समाजमनात पोहचण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

राज्यभरात पाठवल्या प्रतिमा
प्रथम त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांना फोटो हवे असतील त्यासाठी त्यांचे पत्ते मागवले तर त्या डिजिटल प्रतिमासाठी मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, शहादा, नंदुरबार, अहमदनगर, कोल्हापूर, राहुरी, बीड, जालना, औरंगाबाद, जळगाव, रावेर, येथून फोटोसाठी मागणी आल्यानंतर त्या पत्त्यावर त्यांनी त्या प्रतिमा पोस्टामार्फत पाठवण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, पोस्ट मास्टर संजय महाजन, गोकुळ महाजन, जीवन बुगले, विलास महाजन, प्रमोद गावंडे उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !