कृत्रिम बुद्धिमत्तेने तंत्रज्ञानात मोठे बदल : प्राचार्य सिंह
भुसावळ : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून भविष्यातील तंत्रज्ञानात खूप मोठे अमुलाग्र बदल घडवून आणेल, असे भाकीत सखोल अभ्यास आणि विश्लेषणांनीशी वर्तवले होते आणि आज जवळपास सहा दशकांनंतर ते खरे ठरत आहे, असे मत श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात एआय डे साजरा करण्यासाठी तयार केलेल्या माहितीपत्रकाचे ऑनलाईन अनावरण करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी मांडले.
29 जानेवारी कृत्रिम बुद्धीमत्त दिवस
भविष्यातील ह्या उदयोन्मुख क्षेत्राची मूळ खोलवर रूजली जावी ह्या साठी, महाराष्ट्र राज्यात तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत, नासकॉम आणि आयटीएस यांच्या संयुक्त विद्यमाने 29 जानेवारी 2021 हा दिवस कृत्रिम बुद्धिमत्ता दिवस अर्थात आर्टिफिशियाल इंटेलिजन्स डे (एआय डे) म्हणून साजरा करण्याचे योजिले आहे. या दरम्यान ंत्रज्ञानाच्या नवीन शाखेची भविष्यातील गरज आणि उपलब्धी ओळखून ह्या तंत्रज्ञाच्या महितीसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या माध्यमातून एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची आणि शिबिराच्या माहिती पत्रकाचे अनावरण श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, महाविद्यालयाचे डीन डॉ.राहुल बारजिभे, डॉ.सुधीर ओझा, डॉ.पंकज भंगाळे, डॉ.गिरीष कुळकर्णी, डॉ.दिनेश पाटील, प्रा.अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ.राहुल बारजिभे व डॉ.गिरीष कुळकर्णी यांनीही मार्गदर्शन केले.



