एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसला नेपानगरला थांबा
भुसावळ : लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडीला नेपानगर स्टेशन येथे थांबा देण्यात आला. डाऊन 01015 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडीला 1 फेब्रुवारी ते 31 मार्चदरम्यान नेपानगर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 01016 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडीला 1 फेब्रुवारी ते 31 मार्चदरम्यान नेपानगर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


