राजकीय दबावापोटी वरणगावच्या मंजूर उद्यानाचे पैसे इतरत्र वळवले
मुख्याधिकार्यांविषयी माजी नगराध्यक्ष सुनील काळेंची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
वरणगाव : वरणगावचे मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी राजकीय दबावापोटी वरणगाव शहरातील जगदंबा नगरातील सुरू केलेले पंचमुखी गार्डनचे काम अर्धवट व मकरंदनगर मधील संकटमोचक बगीच्यांच्या मंजूर निधी पूर्व परवानगी न घेता इतरत्र वळविलयाने दोन गार्डनची कामे अर्धवट राहिल्याने रहिवाशांवर अन्याय झाल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकार्यांनी तक्रारीची दखल घेत सात दिवसांच्या आत लेखी अहवाल मागितला असून पुढील कारवाईकडे वरणवासीयांचे लक्ष लागले आहे.
राजकीय दबावापोटी काम सोडले अपूर्ण
मंजूर उद्यानाबाबात निविदा काढल्यानंतर वर्क ऑर्डर दिली असतांना मुख्यधिकारी व ठेकेदार यांनी संगमत करून मुद्दाम हे काम अर्धवट ठेवण्यात आले व राजकीय दबावापोटी मुख्यधिकार्यांनी पूर्वपरवानगी न घेता 15 व्या वित्त आयोगाचा निधी शिल्लक असतांना सुद्धा 14 व्या वित्त आयोगातील निधी इत्ररत वळविला तसेच तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिरासाठी तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दोन कोटी 72 लाख मंजूर करून दिले. पहिल्या टप्याने 90 लाखांचे काम सुरू करण्याची वर्क ऑर्डर सहा महिन्यापूर्वी दिली असतांना ठेकेदार काम सुरू करत नाही. या दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी होऊन यामध्ये मुख्याधिकारी व ठेकेदार यांनी संगमत करून मनमानी केली आहे, चौकशी होऊन कारवाईची मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी लेखी तक्रार केली आहे.



