गावठी कट्ट्यासह संशयीत गुन्हे शाखेच्या जाळ्यात


गंभीर गुन्हा करण्यापूर्वीच पोलिसांनी आवळल्या संशयीताच्या मुसक्या

जळगाव : गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या संशयीताच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळत आरोपीच्या ताब्यातून गावठी पिस्टल जप्त केले. रवींद्र (माया) माधवराव तायडे (रा.भोईवाडा, मुक्ताईनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मुक्ताईनगर शहरात शहरातील श्री कॉलनी परीसरात रविंद्र उर्फ माया माधवराव तायडे हा गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले व मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख, दीपक पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अशोक पाटील तसेच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे श्रावण जावरे, गोपीचंद सोनवणे, विजय कचरे आदींच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळत त्याच्या ताब्यातून गावठी पिस्टल जप्त केले.


 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !