आर्या फाऊंडेशनच्या वतीने सात कर्तृत्ववान महिलांचा गौरव


हळदी कुंकवानिमित्त आयोजित कार्यक्रमात केला गौरव

भुसावळ : आर्या फाऊंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडीकल कॉलेज व हॉस्पीटल तसेच हिरकणी महिला मंच व रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयंती निमित्त समाजातील सामाजीक, शैक्षणिक व विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना काम करण्याचे बळ मिळावे यासाठी तालुक्यातील सात महिलांचा गौरव करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
पांडुरंग टॉकीजमागील बालाजी मंदिराजवळ आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे प्रेसिंडेेंट सुधाकर सनंसे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन कोटेच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या मंगला साबद्रा, डॉ.मधू मानवतकर, आर्या फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.वंदना वाघचौरे, अध्ययन पॅरामेडीकल कॉलेजच्या प्राचार्य मनीषा बाविस्कर, ममता रैसनंसे, रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे प्रोजेक्ट सेक्रेटरी संजू भटकर आदी उपस्थित होते.


महिलांमधील गुण हेरण्याचे काम मंचकडून : डॉ.वाघचौरे
प्रास्ताविकात डॉ.वंदना वाघचौरे म्हणाल्या की, महिलांमध्ये विविध गुण असून हे गुण संसारात बाजुला राहतात परंतु असे गुण हेरण्याचे काम हिरकणी महिला मंचच्या वतीने हेरले जातात यासाठीच या मंचची स्थापना करण्यात आली आहे. डॉ.मधू मानवतकर यांनी महिलांनी दररोजच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरच आहे. अध्ययन पॅरामेडीकलच्या प्राचार्य मनीषा बाविस्कर म्हणाल्या की, कोरोना ही जरी आपत्ती असली तरी त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले आहे. या काळात देखील आपल्याला विविध करीयरच्या संधी उपलब्ध आहेत. त्याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहेे. सूत्रसंचलन अलका भटकर यांनी तर आभार हिरकणी महिला मंचच्या अध्यक्षा सुवर्णा इंगळे यांनी केले.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
यशस्वीतेसाठी हिरकणी महिला मंचच्या सचिव बबिता सिंग, अ‍ॅड. मनिषा बाविस्कर, पौर्णीमा म्हसाने, सरोजीनी रामटेके, मोनिका डॅनियल, छाया चौधरी, मालती येवले, राजश्री सोनवणेे, रोजबेल धामणे, राजेश्री सुरवाडे, महानंदा पाटील, वैशाली सपकाळे, किशिष गोगीय, सीमा जवरे, रक्षा भालेराव आदींनी घेतले.

यांचा झाला हिरकणी पुरस्काराने गौरव
महिला समुपदेशन केंद्राच्या भारती म्हस्के, पत्रकार उज्ज्वला बागुल, महिलांसाठी कार्य करणार्‍या आयुध निर्माणी वरणगव येथील शिलांबरी जमदाडे, वरणगाव येथील बचत गटाचे उत्तम कार्य करणार्‍या प्रतिभा तावडे, सुपडाबाई गायकवाड, गटसाधन केंद्रातील शैला कुमावत यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !