भुसावळातील मद्य दुकानाला जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये सील


जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीज परीसरातील जे.जी. नागराणी यांच्या देशी दारु दुकानास जिल्हाधिकार्‍यांच्या  आदेशानुसार येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारणे दाखवा नोटीस बजावत सील लावल्याची कारवाई शुक्रवारी केली. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यस्तरीय पथकाने  दारू दुकानांची तपासणी केली होती. शहरातील कांबडी बार म्हणून प्रचलित असलेल्या दुकानात पथकाने एमआरपीची केस केली होती. त्यानंतर याबाबतचा अहवाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानंतर राज्य उत्पादन विभागाचे विभागीय निरीक्षक ईश्‍वर वाघ यांनी पथकासह नागराणी यांच्या  (कांबडी बार) दुकानाला शुक्रवारी सील लावले. कारवाई संदर्भात अशोक नागराणी म्हणाले की,  दुकान सील करण्यात आले असून एमआरपीसीची कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. याबाबती सुनावणी होईल त्यावेळी सदर नोटीसीला उत्तर देण्यात येईल.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !