वरणगाव भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी प्रणिता पाटील -चौधरी
वरणगाव : भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी प्रणिता वसंतराव पाटील चौधरी यांची नियुक्ती भाजपाचे शहराध्यक्ष सुनील प्रभाकर माळी यांनी केली. शहरात आगामी पालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे बहुमत मिळवण्यासाठी महिलांचे संघटन वाढीसाठी प्रणिता चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे माजी मंत्री गिरीष महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, प्रदेश चिटणीस भाजपा खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी अभिनंदन केले असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी वसरचिटणीस गोलू राणे कुंदन माळी यांनी कळविली आहे. निवडीप्रसंगी ज्येष्ठ नेते मनोहर सराफ, शामराव धनगर, युसूफ खान, नटराज चौधरी, हितेश चौधरी, आकाश मेढे, गजानन वंजारी, अल्पसंख्यांक अध्यक्ष डी.के.खाटीक, तेजस जैन, दीपक चौधरी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
