भुसावळातील अ‍ॅड.नंदिनी चौधरी यांना बार कौन्सिलची सनद


भुसावळ : माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांची सुकन्या अ‍ॅड.नंदिनी अनिल चौधरी यांना नुकतीच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवाची सनद प्राप्त झाली आहे. एलएलएम करून गोरगरीब जनतेचे खटले न्यायालयात चालवून आपल्या अनुभवाचा त्यांना फायदा मिळवून देण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त करीत समाजातील अन्यायग्रस्त लोकांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी वकिली व्यवसाय करणार असल्याची ग्वाही दिली.

यशानंतर शुभेच्छांचा वर्षाव
अ‍ॅड.नंदिनी चौधरी यांनी जिद्द व परीश्रमाच्या जोरावर मिळवलेल्या यशानंतर त्यांचे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, बंधू तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरीं, धीरज चौधरी आदींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !