धक्कादायक ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 47 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 57 हजार 81 वर : एकाच दिवसात 41 रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे 47 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1358 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 57 हजार 81 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 55 हजार 379 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर सोमवारी एकाच दिवसात 41 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

सोमवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 22
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 01
अमळनेर 03
चोपडा 02
पाचोरा 01
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 01
एरंडोल 01
जामनेर 00
रावेर 03
पारोळा 00
चाळीसगाव 08
मुक्ताईनगर 04
बोदवड 00
अन्य जिल्हा 01


24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात जळगाव शहरातील 74 वर्षीय महिला व चाळीसगाव तालुक्यातील 80 वर्षीय महिलेचा उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व समर्थ हॉस्पीटल, चाळीसगाव येथे मृत्यू झाला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !