जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 46 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 57 हजार 127 वर : एकाच दिवसात 45 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे 46 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1359 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 57 हजार 127 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 55 हजार 424 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर मंगळवारी एकाच दिवसात 45 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात एक रुग्णाचा मृत्यू झाला.
मंगळवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 08
जळगाव ग्रामीण 01
भुसावळ 09
अमळनेर 03
चोपडा 00
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 01
एरंडोल 01
जामनेर 00
रावेर 00
पारोळा 00
चाळीसगाव 20
मुक्ताईनगर 01
बोदवड 01
अन्य जिल्हा 01



