धक्कादायक : पत्नीचा गर्भपात करीत पती पडला मावस बहिणीच्या प्रेमात
नवी दिल्ली : पत्नीचा जबरदस्तीने गर्भपात करून तिघा घराबाहेर पती चक्क पत्नीच्या प्रेमात पडल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. पंजाबी कॉलनीतील नितिन लालने 2016 मध्ये राणी कुमारीसोबत विधिवत लग्न केले होते.पीडितेने सांगितले की, तिची सख्खी मावस बहिण शिल्पी गुप्तासोबत तिचा पती नितीन लालचं अफेअर सुरू आहे. याची खबर तिला लग्नाच्या काही दिवसातच लागली होती. पण नंतर दोघांमध्ये असं ठरलं की, ते दोघे पुन्हा कधी बोलणार नाही पण दोघांचं अफेअर सुरूच होतं आणि ते फोर व्हीलरची डिमांड करत आहेत.
तिघांना घेतले ताब्यात
राणी तिचं माहेर झारखंडच्या चतराहून गुरूवारी सासरी पोहोचली. इथे पोहोचल्यावर तिला सासरे, दीर आणि घरातील सदस्यांनी मारहाण केली आणि घरातून बाहेर काढले. पीडिता रात्रभर घराबाहेर बसून होती. तिने इंटरनेटवरून फोन नंबर शोधून डीजीपी, आयजी, एसएसपी, डीएसपीसहीत इतर ही अधिकार्यांना याची माहिती दिली. तसेच व्हॉट्सअॅपवर त्यांना व्हिडीओही पाठवला. तिला वाटलं कुणीतरी आलं तर तिला रात्रभर रस्त्यावर रहावं लागलं नसतं. पण कुणीच आलं नाही. कडाक्याच्या थंडीत तिने रात्र घराबाहेर काढली. सकाळ होताच पीडिता राणी कुमारी व्हिडीओ घेऊन गया एसएसपी ऑफिसमध्ये पोहोचली आणि इथे तिने कारवाईसाठी अर्ज केला. राणी कुमारीने सांगितले की, ती चतराहून आपल्या सासरी सकाळी 10 वाजता पोहोचली. पण घराला कुलूप होतं. मग तिने सासर्यांच्या दुकानात चावी मागितली. तर तिला मारहाण करण्यात आली. तिला घरातून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तिने पूर्ण रात्र बाहेरचं काढली. पोलिसांनी महिलेचे सासरे, दीर आणि इतर 3 लोकांना ताब्यात घेतले आहे.

