निवडणूक जवळ येताच पेट्रोलसह डिझेल पाच रुपयांनी झाले स्वस्त


गुवाहाटी : आसाममध्ये यावर्षी एप्रिल-मे महिन्यादरम्यान विधानसभेची निवडणूक होत असून निवडणुकीला काही महिने असतानाचा राज्यात पेट्रोल आणि मद्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर कपात झाली आहे. नवे दर आज रात्रीपासून लागू होणार आहेत. आसाम सरकारने आज याबाबतची माहिती दिली आहे. पेट्रोल-डिझेल आणि मद्याचे दर कमी करण्याचा निर्णय हा विधानसभा निवडणुकीला महिनाभराचा अवधी असताना घेतला गेला आहे. या निर्णयानुसार आसाममध्ये पेट्रोल आणि डिझेल हे पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे तर मद्यावर आकारण्यात येणारा करही 25 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. आसामचे वित्तमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी या निर्णयाची विधानसभेत घोषणा केली.

लाखो ग्राहकांना दिलासा
कोविड-19 चा फैलाव शिखरावर असताना पेट्रोल-डिझेल आणि मद्यावर अतिरिक्त सेस आकारण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमी होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कॅबिनेटने आज सकाळी अतिरिक्त सेस हटवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता राज्यात पेट्रोल आणि डिझेल पाच रुपये प्रति लिटरने स्वस्त होईल. या निर्णयामुळे लाखो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !