भुसावळात शेकडो भाजपेयींनी बांधले हातावर ‘घड्याळ’
भुसावळ : कार्यकर्ता संवाद यात्रेनिमित्त तेली समाज मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात शेकडो भाजपेयी असलेल्या मात्र खडसेप्रेमी समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
वरणगावचे सुधाकर जावळे, रोहिणी जावळे, महेश सुपडू सोनवणे, माजी नगराध्यक्ष अरुणा इंगळे, बोदवड कृउबा सदस्य किशोर वसंत भंगाळे, शेख आसीफ, प्रकाशसिंग ठाकूर, संदीप सरोदे, विनोद धनगर, भागवत झोपे, लता गायकवाड, मोहन भिरूड यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.


यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, युवती सभेच्या अध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवा कार्याध्यक्ष रवी वरपे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, आमदार अनिल पाटील, माजी आमदार मनीष जैन, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, बाजार समिती सभापती सचिन चौधरी, माजी नगराध्यक्ष तथा ओबीसी सेलचे उमेश नेमाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, सतीश घुले, धीरज चौधरी, जय चौधरी, आदींची उपस्थिती होती.
