धक्कादायक ! : डॉक्टरांनी केली पत्नीचा गळा चिरून केली हत्या


तामिळनाडू : डॉक्टरांना देवाचे रूप मानले जात असलेतरी व्यावसायाला काळीमा फासणारी घटना चेन्नईत समोर आली आहे. डॉक्टराने आपल्या पत्नीचा गळा चिरून हत्या केली आहे. कीर्थना असे मयताचे नाव असून आरोपी डॉक्टरचं नाव गोकुल कुमार आहे.

गळा चिरत पत्नीला कारखाली चिरडले
28 वर्षीय कीर्थना एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ह्यूमन रिसोर्स मॅनेजर म्हणून काम करत होती तर गोकुल एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करीत होता. कीर्थनाची मोठी बहीण गोकुलच्या मोठ्या भावाची पत्नी आहे. या दोघांच्या लग्नातच गोकुल आणि कीर्थनाची भेट झाली होती. ज्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि नंतर त्यांनी लग्न केलं होतं. गोकुल आणि त्याच्या पत्नीचं नेहमीच भांडण होत होतं. लॉकडाऊननंतर तर भांडणांचं प्रमाण वाढलं होतं लॉकडाऊनमध्ये डॉक्टरने काम करणं बंद केलं होतं. 6 महिन्यांआधी दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. दोघांना एकमेकांपासून वेगळं व्हायचं होतं. शुक्रवारी सायंकाळी साडे चार वाजता कीर्थना आणि गोकुल यांच्या काही गोष्टीवरून वाद सुरू झाला होता. ज्यानंतर गोकुल किचनमधून चाकू घेऊन आला आणि निर्दयीपणे आपल्या पत्नीचा गळा कापला. त्यानंतर त्याने पत्नीला कारखाली चिरडलं.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !