लोकमान्य टिळक टर्मिनस-फैजाबाद दरम्यान विशेष ट्रेन धावणार
भुसावळ : प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस फैजाबाद विशेष गाडी पुढील आदेशापर्यंत चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
एलटीटी-फैजाबाद विशेष गाडी
डाऊन 02049 लोकमान्य तिलक टर्मिनस-फैजाबाद विशेष गाडी 22 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहुन 1.40 वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्या दिवशी फैजाबादला 5.30 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक, जळगाव व भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 02050 फैजाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 23 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर मंगळवारी फैजाबादहून 10.45 वाजता रवाना झाल्यानंतर तिसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला 3.45 वाजता पोहोचेल. या गाडीला भुसावळ, जळगाव, नाशिक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक एसी टू टीयर, चार एसी थ्री टीयर, 12 स्लीपर क्लास, तीन द्वितीय श्रेणी सीटिंग बोगी जोडण्यात येणार आहे. 20 फेब्रुवारीपासून या गाडीचे आरक्षण सुरू झाले असून केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी मिळेल शिवाय प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्य स्थानाच्या ठिकाणी कोविड नियमांचे पालन करावे लागणार आहे.

