पोलिस कर्मचार्याची गळफास घेवून आत्महत्या
पुणे : बंडगार्डन ठाण्यातील पोलिस कर्मचारी नाना हंडाळ (वय 40 रा.शिवाजीनगर पोलिस लाईन) यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना घडली. नाना हंडाळ हे शिवाजीनगर पोलीस लाईन येथे परिवारासोबत राहत होते. ते बंडगार्डन पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. हंडाळ हे शुक्रवारी संध्याकाळी घरी आले. त्यावेळी त्यांच्या घरी कुणीच नव्हते. यानंतर त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. यानंतर शेजारी राहणार्या नागरिकांनी हंडाळ यांना रुग्णालयात हलविले. परंतू, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.







