भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा


मुंबई : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. वाघ यांचे पती किशोर वाघ यांना 2016 मध्ये लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात झाली होती. किशोर वाघ यांच्या विविध शहरात असलेल्या मालमत्तांपैकी 90 टक्के मालमत्ता ही बेहिशेबी मालमत्ता असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला असून एक कोटींहून अधिकची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा दावा आहे.

सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप
महाविकास आघाडी सरकारवर भाजपाने जोरदार टीका करीत चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप भाजपा नेते आणि विधान परीषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला त्यांच्याविरोधात बोललेले आवडत नाही. असे जर कुणी काही बोलले तर त्यांची जुनी प्रकरणे बाहेर काढली जातात, असेही ते म्हणाले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !