कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांचा राजीनामा
प्रभारी कुलगुरूपदी डॉ.ई.वायुनंदन यांची नियुक्ती : 8 रोजी पदभार स्वीकारणार
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला असून प्रभारी कुलगुरू म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ई.वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 8 मार्चला डॉ. वायुनंदन हे पदभार स्वीकारतील.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिला राजीनामा
कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे कुलगुरू पदाचा राजीनामा पाठविला होता. हा राजीनामा स्वीकारला असल्याचे राजभवनाचे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले असून 8 मार्चपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्याकडे प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार देण्यात येत असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रा. पी.पी. पाटील यांचा कार्यकाळ 25 ऑक्टोबर 2021 रोजी संपुष्टात येणार होता.







