बंगळुरू-अहमदाबाद रेल्वेत दरोडा
सोलापूर : बंगळुरू-अहमदाबाद एक्सप्रेस रेल्वे गाडीत सोमवारी पहाटे दरोडा पडल्याने खळबळ उडाली असून दरोडेखोरांनी महिला प्रवाशांना मारहाण करून 50 तोळे सोने लुटल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बोरोटी-नागणसूर हद्दीत घडली. याबाबत संबंधित महिला प्रवाशांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची प्राथमिक माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली.







