22 वर्षीय तरुणीवर सलग आठ महिने अत्याचार
बरनाला : 22 वर्षीय तरुणीवर तब्बल आठ महिने अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील बरनालात घडल्याने संताप व्यक्त होत आहे. पीडितेने नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे दोन महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये एका राजकीय पक्षाचा नेत्याचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी तीन पोलिस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी 24 जून रोजी त्यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहणारी महिला बहिणीला फूस लावून एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या भावाच्या घरी घेऊन गेली. नेत्यासोबत एक भोंदू बाबा आणि काही महिलांसह 20 ते 25 जण आधीच उपस्थित होते. तिथे तिला पिण्यासाठी शीतपेय दिले. ते प्यायल्यानंतर बहीण बेशुद्ध झाली. त्याच दिवशी तिच्यावर त्या नेत्याने आणि काही जणांनी बलात्कार केला. बहिणीला 17 दिवस बरनाला जिल्ह्यातील पंधेर गावात डांबून ठेवण्यात आलं. त्यानंतर संगरूरमधील एका गावात तीन दिवस डांबून ठेवले. बठिंडा येथे घेऊन गेले. तिथे जबरदस्ती तिचे लग्न लावून दिले. लग्नाच्या बदल्यात आरोपींनी 70 हजार रुपये घेतले होते, असा आरोपही तिच्या भावाने केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

