बिजासन घाटात तिहेरी अपघात ; एक जण ठार
शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बिजासन घाटात तिहेरी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा पाय तुटल्याची घटना घडली. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील बिजासन घाटात तिहेरी भीषण अपघात झाला. एक अवजड ट्रक बिजासन घाट उतरत असतांना अचानक ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने समोरून जाणार्या मोटरसायकला चिरडत आयशर वाहनाला धडक दिली. यात आयशर व ट्रक दोन्ही वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले तर मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच बिजासन पोलिस व नागरीक मदत कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. या भीषण अपघातात एक जण जागीच मयत झाला तर चार जण अपघातात अडकले होते. यात ट्रक चालक स्टेअरींगमध्ये अडकल्याने पोलिसांनी बाहेर काढल्यानंतर चालकाचा पाय तुटला तर एक गंभीर असून तीन किरकोळ जखमी आहेत. या अपघातात मयत झालेला मोटारसायकल चालक शिरपूर तालुक्यातील पारशीपाडा येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

