कत्तलीच्या इराद्याने जनावरांची वाहतूक : पाच गुरांची सुटका


दोन लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त

शिरपूर : शहरातील शिंगावे शिवारात शिरपूर शहादा रस्त्यावर पोलिसांना वाहन तपासणी दरम्यान पिकअप वाहन पाच गुरांना निर्दयीपणे कोंबुन कत्तलीच्या उद्देशाने वाहतुक करताना आढळून आल्याने गुरे व वाहन जप्त करीत चालकविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाच गुरांची सुटका
शिरपूर-शहादा रस्त्यावर शहर पोलिसांकडून वाहन तपासणी करण्यात येत असताना दुपारी पिकअप (एम.एच.48 टी.2590) मध्ये पाच गुरांना निर्दयीपणे कोंबुन कत्तलीच्या उद्देशाने शिरपूर शहराकडे वाहतूक करीत असल्याचे चौकशीत पोलिसांना आढळून आल्याने 34 हजार रुपये किमतीची पाच जनावरे व दोन लाख 50 हजार असा एकूण दोन लाख 84 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला सदर जनावरे गोशाळेत देखभालीसाठी पाठविण्यात आली आहेत.

शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पो. कॉ. महेंद्र देवराम सपकाळ यांच्या फिर्यादी वरून वाहन चालक संशयीत दयाराम अनसिंग पावरा (रा.कढई पाणी, ता.शिरपूर) याच्याविरुद्ध भादंवि व प्राणी संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !