सा.बां.विभागाचे लाचखोर सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
नाशिक पीडब्ल्यूडी कार्यालयाच्या आवारात 70 हजारांची लाच मागणी भोवली
नाशिक : ठेकेदारीने केलेल्या रस्ता दुरुस्तीचे कामाचे बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात लाचेपोटी 70 हजार मागणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कळवण विभागाचे सहाय्यक अभियंता गंगाराम सीताराम भोये (52) यांना लाच मागणी प्रकरणी नाशिक एसीबीच्या पथकाने सोमवारी अटक केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.
लाच मागणी भोवली
आरोपी भोये यांनी 17 फेब्रुवारी रोजी तक्रारदार ठेकेदाराकडे 70 हजारांची लाच मागितली होती व या प्रकरणी एसीबीकडे अहवाल आल्यानंतर पथकाने आरोपीला अटक केली. या प्रकरणी सोमवारी नाशिकमधील मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा (गुरक्र 56/2021) दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे, हवालदार सुकदेव मुरकुटे, नाईक मनोज पाटील, हवालदार माळी व चालक जाधव आदींनी ही कारवाई केली.







