भुसावळ-भादली दरम्यान बुधवारी पॉवर ट्रॅफिक ब्लॉक


हावडा, बरोनी एक्सप्रेस दोन तास खोळंबणार

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ ते भादली दरम्यान बुधवार, 3 फेब्रुवारी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे अहमदाबाद हावडा डाऊन व अहमदाबाद बरोनी डाऊन या एक्सप्रेस गाड्या तब्बल दोन तास रेंगाळणार असून प्रवाशांनी गैरसोयीची दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

बुधवारी पॉवर ट्रॅफिक ब्लॉक
भुसावळ ते भादली दरम्यान स्टील प्लेट गर्डर आरओबी लाँचिंगच्या कामासाठी बुधवारी किलोमिटर 441/29-31 मध्ये विशेष पॉवर ब्लॉक आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही गाड्यांवर परीणाम होणार आहे. गाडी क्रमांक 02833 डाउन अहमदाबाद-हावडा ही गाडी जळगाव स्टेशन येथे दोन तास थांबवली जाईल. गाडी क्रमांक 09483 अहमदाबाद-बरोनी डाऊन पाळधी स्टेशन येथे दोन तास थांबवली जाईल तसेच गाडी क्रमांक 02259 डाऊन मुंबई-हावडा शिरसोली स्टेशन येथे 50 मिनिट थांबवली जाईल. गाडी क्रमांक 02779 डाऊन वास्को निजामुद्दीन-म्हसावद स्टेशन येथे 45 मिनिट थांबवली जाणार आहे. प्रवाशांनी नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !