जामिनावर सुटलेल्या आरोपीने केली पीडीतेच्या पित्याची हत्या


नवी दिल्ली : युपीतील हाथरसमध्ये लैंगिग शोषणाच्या आरोपानंतर तुरूंगात गेलेल्या आरोपीला जामीन मिळाल्यानंतर त्याने पीडीतेच्या वडिलांची गोळी मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

जामीनावर सुटताच केली हत्या
हाथरस पोलिसांनी सांगितले की, आरोपी गौरव शर्माला 2018 मध्ये लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गावातील एका मंदिराबाहेर आरोपी व पीडितेच्या कुटूंबात एखाद्या गोष्टीवरून वाद झाला आणि त्यानंतर गौरवने गोळीबार केला. पीडितेच्या वडिलांचा रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.सोमवारी पीडित महिला पोलिस स्टेशनच्या बाहेर रडत आणि न्यायाची मागणी करताना दिसली. ती म्हणाली, ’मला न्याय द्या. आधी त्याने माझा विनयभंग केला आणि आता माझ्या वडिलांना गोळीबार करून ठार केलं. तो आमच्या गावात आला. त्याच्यासमवेत सहा-सात जण होते. माझ्या वडिलांची कोणाशीही वैर नव्हते. गौरव शर्मा असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी आतापर्यंत गौरव शर्माच्या कुटूंबातील सदस्यास अटक केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !