पत्नी असताना ‘लिव्ह इन रीलेशनशिप’ भोवली : उपनिरीक्षकाचे निलंबन


पुणे : पत्नी असतानाही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहणे एका पोलिस उपनिरीक्षकास चांगलेच भोवले असून अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी त्याला निलंबित केल्याने खळबळ उडाली आहे. गडचिरोलीमध्ये कर्तव्यावर असताना एका तरुणीशी प्रेमसंबंध ठेवून तिच्याबरोबर डिसेंबर 2019 पासून हडपसरमध्ये उपनिरीक्षक कर्तव्यावर असल्याची माहिती आहे. ऑगस्ट 2019 पूर्वी उपनिरीक्षक गडचिरोलीला असताना एका तरुणींबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले. तिला त्याने पुण्यात आणून हडपसर येथे भाड्याने घर घेऊन दिले. तेथे ते डिसेंबर 2019 पासून लव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात या तरुणीचा सविस्तर जबाब नोंदविला असून त्यात त्यांच्यात वारंवार शारीरिक संबंध आले. एक वेळा गर्भपातदेखील करण्यात आलेला आहे. लग्नास नकार दिल्याने त्यांच्यात वारंवार भांडणे झाली. या तरुणीने भरोसा सेलमध्ये तक्रार अर्ज दिला होता. या ठिकाणी दोघांचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी तरुणीने महिला दक्षता समितीच्या सदस्यांसमोर नंतर कोणतीही तक्रार नसल्याचे लिहून दिले आहे. विवाहित असताना तरुणीसोबत अनैतिक प्रेमसंबंध ठेवणे, तिला गर्भपात करावयास भाग पाडणे हे वर्तन पोलिस दलाची समाजातील प्रतिमेस बाधा आणणारे असल्याने या पोलिस उपनिरीक्षकाला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !